ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का

October 10, 2017 1 Comment
ओव्हूलेशन शिवाय मासिक पाळी येऊ शकते का ?जाणून घ्या anovulatory bleeding म्हणजेकाय ? आणि त्यातून कसला संकेत मिळतो ?
मी ३० वर्षांची महिला आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला सांगितले की तिला anovulatory bleeding होतं. anovulatory bleeding म्हणजे काय? मासिकपाळी येते पण ovulate होत नाही, असे होऊ शकते का? याचा फर्टिलिटीशी काही संबंध आहे का? कृपया याबद्दल सविस्तर सांगा.या प्रश्नाचे उत्तरन्यू दिल्लीच्या मॅक्सहॉस्पिटलचे Consultant Gynaecologist आणि Unit Head डॉ. उमा वैद्यनाथनयांनी दिले.हो,ओव्हूलेशनशिवाय मासिक पाळी येणे शक्य आहे. याला anovulatory bleeding असे म्हणतात. पहिल्यांदा पाळी आल्यानंतर १-२ वर्षांत किंवा मोनोपॉज जवळ आल्यानंतर असे होते. परंतु, वयाच्या २५-३० व्या वर्षी ही समस्या उद्भवली तर ती गंभीर ठरू शकते आणि त्यावर वेळीच उपचार होणे गरजेचे आहे.या ‘५’ आयुर्वेदीक टीप्सने लवकर येणारा मेनोपॉज रोखा !हार्मोनल चेंजेस हे anovulatory bleeding चे प्रमुख कारण आहे. म्हणून anovulatory bleeding बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी मासिक पाळीत होणाऱ्या हार्मोनल बदल याविषयी माहिती करून घेणे आवश्यक आहे. मासिक पाळीत मेंदूतून स्त्रवणाऱ्या हार्मोनमुळे अंड निर्मितीसाठी ओव्हरीला चालना मिळते आणि oestrogen हॉर्मोनची निर्मिती होते. ज्यामुळे endometrium ची वाढ होते. अंड निर्मितीनंतर progesterone हॉर्मोन स्त्रवतं. ज्यामुळे गर्भधारणेसाठी गर्भाशय तयार होतं. त्याचबरोबर anovulatory bleeding मध्ये ओव्यूलेशन नझाल्यामुळे progesterone हॉर्मोन स्त्रवत नाही.कमी वयात मॅनोपॉज येणं हा त्रास अनुवंशिक असू शकतो का ?परंतु, oestrogen च्या अतिरिक्त निर्मितीमुळे uterine wall (गर्भाशयाचे आवरण) सुरक्षित राहण्यास मदत होते. परंतु, ठराविक कालावधी नंतर endometrium सुरक्षित राखणे गर्भाशयाला शक्य होत नाही आणि त्यामुळे रक्तस्त्राव होतो. म्हणून मोनोपॉज जवळ आलेल्या महिलांमध्ये हा त्राससामान्यपणे दिसून येतो. परिणामी पाळीत कमी रक्तस्त्राव होणे, अनियमित मासिक पाळी या समस्या उद्भवतात.या ‘७’ कारणांमुळे मासिक पाळीत नेहमीपेक्षा कमी रक्तस्त्राव होतो !याला dysfunctional uterine bleeding असे ही म्हणतात. anovulatory bleeding मुळे पाळी अनियमित होते. तसंच रक्तस्त्रावाचे प्रमाण आणि काळ यात देखील फरक जाणवतो. हार्मोनल चेंजेस मुळे होणारे anovulatory bleeding हाPCOSकिंवाथायरॉईडचा संकेत असू शकतो. त्याचबरोबर OCPs (oral contraceptive pills) अधिक प्रमाणात घेतल्याने देखील हा त्रास उद्भवतो. तसंच यामुळे ताण येतो, वजनात फरक पडतो. म्हणून याचे नेमके कारण जाणून त्यावरवेळीच उपचार करण्यासाठी स्त्री रोग तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.